Loksabha 2019: चुनाव का महिना... है मच गया शोर! (व्हिडिओ)

Loksabha 2019: चुनाव का महिना... है मच गया शोर! (व्हिडिओ)

सातारा : निवडणुकीतील प्रचारात विविध चालींवर आधारित केलेल्या गीतांचा वापर केला जातो. सध्याची लोकसभा निवडणूकही त्याला अपवाद नाही. या निवडणुकीच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते, तसेच इंडियन ओशनचे गिटारिस्ट राहुल राम, लेखक व कॉमेडीयन वरुण ग्रोव्हर आणि कलाकार संजय राजोरा या तिघांनी 1967 मधील मिलन चित्रपटातील गाजलेले "सावन का महिना' या गाण्याचे "चुनाव का महिना है, मच गया शोर, फिर आया है Time to choose, Who will screw us more

असे उत्कृष्टपणे विडंबन केले आहे. हे गीत नुकतेच यू-ट्यूबवरील Aisi Taisi Democracy मध्ये प्रसारित करण्यात आले आहे. या गाण्यामधून करण्यात आलेले कॉमेडी, सुमधूर संगीत, तसेच सामाजिक-राजकीय विषयांवरील मार्मिक टिप्पणीमुळे लाखो नागरिकांच्या ओठावर हे गीत रुळत आहे. महानगरांच्या कट्ट्यापासून ते गावांतील पारावर हे गीत ऐकू येऊ लागले आहे. त्यामधून देशातील नेत्यांची महत्त्वाकांक्षा, त्यांना संबोधिले जाणारे टोपण नाव, प्रादेशिक नेत्यांची पंतप्रधान होण्याची तीव्र इच्छा, तसेच मुलाने उच्चपदावर पोचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांबरोबरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यास एकटेच सोडल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडींची योगरीत्या मांडणी केल्याने साडेतीन मिनिटांत नागरिकांच्या डोळ्यासमोर देशातील राजकीय चित्र उभे राहात आहे.
 

- असे आहेत गाण्याचे बाेल 

चुनाव का महिना है, मच गया शोर
फिर आया है Time to choose,

Who will screw us more
ऐसा गया है ये discourse नीचे
गोत्र, जनेऊ, versus, Hate की Speeches

कोई बोले पप्पू, कोई चौकीदार चोर
आगया है Time to choose,

Who will screw us more
पवार, सबका है सपना
PM की कुर्सी पे, नाम हो अपना
सोनिया, मुलायम का भी तो है सपना

PM की कुर्सी पे, मुन्ना हो अपना
और अडवानी जी रोए, in a corner alone
अरे आगया है Time to choose,
Who will screw us more

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com