Loksabha 2019 : देशाचे तुकडे करण्याचे राजकारण - जावडेकर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कॉंग्रेसने 20 वर्षांपूर्वी जी आश्‍वासने दिली होती, तिच आश्‍वासने आता जाहीरनाम्याच्या रूपाने पुढे आली आहेत. यापूर्वी दिलेली आश्‍वासने त्यांनी पाळली नाहीत. देशद्रोह करणे हा गुन्हा होणार नसल्याचे कॉंग्रेसने सांगितले आहे.

सोलापूर - कॉंग्रेसने 20 वर्षांपूर्वी जी आश्‍वासने दिली होती, तिच आश्‍वासने आता जाहीरनाम्याच्या रूपाने पुढे आली आहेत. यापूर्वी दिलेली आश्‍वासने त्यांनी पाळली नाहीत. देशद्रोह करणे हा गुन्हा होणार नसल्याचे कॉंग्रेसने सांगितले आहे. त्यामुळे देशाचे तुकडे करण्याचे राजकारण कॉंग्रेसने सुरू केल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केले. 

सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी जावडेकर आज सोलापुरात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""कॉंग्रेसने 20 वर्षांपूर्वी प्रत्येक गावात वीज देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण केले नाही. अनेकांना घरे देण्याचेही आश्‍वासन दिले; पण त्याची पूर्तता त्यांच्याकडून झाली नाही. शिवसेनेवर खटले भरण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले आहे.'' दहशतवादी कारवाई करणाऱ्यांना जामीन देण्याची तरतूद कॉंग्रेस करू पाहात आहे. म्हणजेच देशाचे तुकडे करण्याचे राजकारण त्यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचा पराभव अटळ असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. 
 

Web Title: Prakash Javadekar said on Wednesday that Congress has started the politics of pieces of country