Loksabha2019 उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे समर्थकांना तडीपारीच्या नाेटीसा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सातारा : लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल सक्रिय झाले आहे. सुरूची धुमश्‍चक्री प्रकरणातील संशयितांसह तब्बल 190 जणांना तडीपार करण्याचे प्रस्ताव शहर व शाहूपुरी पोलिसांनी तयार केले आहेत.

सातारा : लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल सक्रिय झाले आहे. सुरूची धुमश्‍चक्री प्रकरणातील संशयितांसह तब्बल 190 जणांना तडीपार करण्याचे प्रस्ताव शहर व शाहूपुरी पोलिसांनी तयार केले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या आठ दिवसांत मतदान होणार आहे. शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा जोर वाढला आहे. आगामी काळात त्याला आणखी धार येण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय मतदान करता यावे, यासाठी जिल्हा पोलिस दलाने आतापर्यंत विविध प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. शहरातही कायदा व सुव्यवस्था ठिक राहण्यासाठी शहर व शाहूपुरी पोलिस सरसावले आहेत. त्यांनी सुरूची धुमश्‍चक्री सहभागी असलेल्या 118 जणांबरोबरच दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला आहे. त्यानुसार त्यांनी सुमारे 190 संबंधितांना तडीपार का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना दोन दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

मतदानाची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत दबावरहित पार पडावी, अशी पोलिसांची तयारी आहे. त्यानुसार नोटीस बजावण्यात आलेल्यांना तीन ते पाच दिवस तडीपार करण्याचे आदेश होण्याची शक्‍यता आहे; परंतु त्यांना मतदानादिवशी सकाळी आठ ते दोन या कालावधीत शहरात येण्याची मुभा दिली जाण्याची शक्‍यता आहे. सुरूची धुमश्‍चक्री प्रकरणात दोन्ही राजांचे महत्त्वाचे शिलेदार संशयित आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना शहरातून बाहेर राहावे लागण्याची शक्‍यता आहे.

 

 

 

Web Title: Satara police issued notice to Udayanraje-Shivendrasinhraje Karyakrata

टॅग्स