Loksabha 2019 : 'असा आक्रस्ताळी पंतप्रधान जनता प्रथमच पाहते आहे' 

Such aggressive Prime Minister sees for the first time says Jayant Patil
Such aggressive Prime Minister sees for the first time says Jayant Patil

लोकसभा 2019
सांगली : नोटाबंदीमुळे देशाचा नसला तरी भाजपचा नक्कीच विकास झाला. राम मंदिर झाले नसले तरी भाजपची दिल्ली-मुंबईत सात-आठशे कोटींची कार्यालये झाली. भाजप पैसा-सत्तेचे ओंगळवाणे प्रदर्शन करीत आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली. आज ते प्रदिर्घ काळानंतर सांगलीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. नरेंद्र मोदींइतका आक्रस्ताळी पंतप्रधान आजवर देशाने पाहिला नाही. तसे हे पहिलेच प्रकरण असल्यामुळे देश आता त्याबाबत मतपेटीतून निर्णय घेईल असा टोलाही त्यांनी लगावला. 

श्री पाटील म्हणाले, "नोटाबंदीचा लाभ कोणाला झाला हे आता चांगलेच दिसत आहे. देशातील अन्य पक्ष आणि भाजपमधला फरक ते सांगतो आहे. भाजपची राज्याराज्यात कोटींची कार्यालये पाच वर्षात कशी उभी राहतात, हे दिसून येत आहे. या पक्षाचा झालेला भौतिक विकास लोकांच्या चांगलाच लक्षात येत आहे. आता निवडणुकांमध्येही ही मंडळी तो पैसा आणणार आहेत. लोकांची मते मिळवून देणाऱ्यांना सरकारमधले चंद्रकात पाटलांसारखे जबाबदार मंत्री पाच, दहा लाखांची बक्षिसे, सोन्याचे कडे जाहीर करीत आहेत. प्रलोभने दाखवायची आणि मते मिळवायची. हे सत्तेचे-पैशाचे हे ओंगळवाणे प्रदर्शन जनता पहातेय.'' 

ते म्हणाले, "या देशाच्या पंतप्रधानांची भाषाच इतकी खालावली आहे की त्यांच्या चंद्रकांतदादांसारख्या मंत्र्यांकडून कोणती वेगळी अपेक्षा तुम्ही ठेवणार? या देशाने नेहरू, इंदिराजी, शास्त्री, वाजपेयी, व्ही. पी. सिंह अशा अनेक स्टेटस्‌मन पंतप्रधानांची कारकिर्द आजवर पाहिली आहे. असा आक्रस्ताळीपणाचा प्रकार प्रथमच जनता पाहत आहे. आता ती त्यावर मतपेटीतून योग्य तो निर्णय घेईल.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com