Loksabha 2019 : साताऱ्यात 'लाॅ काॅलेज की अदालत'मध्ये उदयनराजे (व्हिडीओ)

विशाल पाटील
मंगळवार, 26 मार्च 2019

  • महाविद्यालयीन युवक-युवतींशी उदयनराजे स्टाईल गप्पा
  • युवा वर्गात उदयनराजेंचा फिव्हर
  • ​साताऱ्यात उदयनराजेंच्या 'स्टाइल', 'डॉइलॉग'ची युवा वर्गात जोरदार चर्चा

लोकसभा 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले हे त्यांच्या दबंग स्टाईलसाठी ओळखले जातात. विशेषतः युवा वर्गात त्यांच्या बोलण्याचे, वागण्याचे चाहते आहेत. उदयनराजेंनी देखील लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ कंबर कसली असून युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ज्याचा एक भाग म्हणून त्यांनी नुकताच 'लाॅ काॅलेज की अदालत'मधून तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. 

लोकसभा निवडणुकीचा जोर वेगाने वाढला असून, त्याचा जबरदस्त 'फिव्हर' तरुणाईवर चढलेला दिसतोय. सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापासून प्रचारांची गीते रिंगटोनवर ठेवण्यापर्यंत, तोंडात फक्‍त 'एकच आवाज...' घोषणेपासून 'बाण मारण्यापर्यंत...', आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ कॉलेज कट्टा ते गावातील बसथांब्यापर्यंत लोकसभा निवडणुकीचीच चर्चा तरुणाईत रंगत आहे.

udayanraje

राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी, तर नावाजलेल्या महाविद्यालयांत जाऊन 'टीआरपी'चा पुरेपूर फायदा घेण्यास सुरवात केली आहे. महाविद्यालयीन युवक- युवतींशी संवाद साधण्याची किमया उदयनराजे करु लागले आहेत. युवा वर्गात उदयनराजेंचा फिव्हर वाढत असल्याने त्यांच्यामध्ये त्यांच्या विविध 'स्टाइल', 'डॉइलॉग'ची सातत्याने चर्चा सुरू असते. 

वाईत निळू फुलेच्या आवाजातील संवाद असाे अथवा आज (मंगळवार, ता. 26) सातारामधील लाॅ काॅलेजमधील कठघरात बसून केलेला संवाद असाे. उदयनराजेंचा हटके अंदाज आणि भावनिक प्रतिक्रियांमुळे काही काळ का हाेईना युवा वर्गांच्या हदयात ते स्थान निर्माण करीत आहेत.

Web Title: Udayanraje Bhosale in Conversation with Law College students in Satara