एकमेकांस सहकार्य करु - उदयनराजे-शिवेंद्रसिंहाराजेंचा सूर

.
.

सातारा : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्ताव खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात मंगळवारी (ता.19) बैठक झाली. या बैठकीत दोघांनीही कार्यकर्त्यांच्या भुमिकेचे स्वागत केले. तसेच आगामी काळातील निवडणुकांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याचे निश्‍चित केले.
सातारा पालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील मनोमिलन संपले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी आपआपला अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन सातारा तालुक्‍यातील राजकरणावर आपला पगडा ठेवला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व आमदारांना उदयनराजेंना मदत करावी अशी सूचना केली. त्यावेळी माध्यमांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भुमिका विचारली असता त्यांनी कार्यकर्त्यांना समजावे लागेल तसेच पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करु असे स्पष्ट केले. खासदार उदयनराजेंनी यांनी त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेऊन सर्वांनी निवडणुीकत राष्ट्रवादीच्या आमदारांचे काम करायाचे असे आवाहन केले. दूसरीकडे आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भुमिका गूलदस्त्यात होती. अखेर शिवसेनेचे नेत नरेंद्र पाटील आणि कॉंग्रेसचे सुनील काटकर व सहकाऱ्यांनी मंगळवारी ता.19 रात्री एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांना बोलाविले. दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दोघांनीही आपल्या दोघांत कोणताही वाद, मतभेद नाहीत, जो काही वाद आहे तो कार्यकर्त्यांत आहे. त्यांची समजूत काढली जाईल अशी ग्वाही दिली. दोघांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना समजावणे तसेच पालिकेतील स्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही नेत्यांची पहिली भेट सकारात्मक झाल्याने भेटीच्या ठिकाणावर उपस्थित असलेल्या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांस मिठ्या मारल्या. दरम्यान आगामी आठवड्यात सातारा तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा घेण्याचे नियोजन करुन ते जाहीर करण्याचे सोपास्कर पाडले जाणार आहेत.

समझोता अदालत वाड्यातूनच.....

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी एकत्र यावे यासाठी कायम आग्रही असणारे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांची भुमिका मंगळवारी ता.19 दोन्ही नेत्यांच्या बैठकीपुर्वी म्हत्वाची ठरली. दुपारच्या प्रहरी शिवाजी काकांनी दोन्ही नेत्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. त्याचा तपशिल मिळू शकला नसला तरी दोघांमध्ये समझोता होणे आवश्‍यक आहे असे त्यांचे म्हणणे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com