Loksabha 2019 : यात्रा अन् मतदान सोबतच आल्याने मतदानाचा वाढला टक्का

अतुल पाटील
मंगळवार, 23 एप्रिल 2019

ऐतवडे खुर्द (सांगली) : लोकसभेसाठी मतदान आणि ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा एकाच दिवशी आली. परिणामी, मतदानात यावर्षी तब्बल सात टक्क्यांची वाढ झाली आहे. मतदानाचा टक्का वाढूनही दिवसभर मतदान केंद्रावर एकदाही रांग लागली नाही, हे विशेष.

ऐतवडेतील भैरवनाथ यात्रेचा मंगळवारी (ता. २३) पहिलाच दिवस होता. त्यामुळे बाहेरगावी असलेली बहुतांश गावकरी दाखल झाले आहेत. लोकसभेला आतापर्यंत सर्वाधिक 65 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा मतदान आणि यात्रा एकाच दिवशी आल्याने मतदानात तब्बल सात टक्के इतकी घसघशीत वाढ झाली आहे. गावचे 71.26 टक्के मतदान झाले आहे.

गावातील वाढलेल्या मतदानाचा टक्का हा यात्रेचा परिणाम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होऊनही कुठल्याच केंद्रावर मतदानासाठी रांग लागली नाही. भैरवनाथाचे मंदीर आणि गावातील मतदान केंद्र जवळच असल्याने दोन्ही कामे एकाच फेरीत उरकली. 

Web Title: Voting was benefited in Aaitvade gaon because of Yatra