रामराजेंच्या पाठीशी रहा, आठवलेंच्या वक्तव्याने कल्लाेळ

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 11 एप्रिल 2019

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.10) सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये सभा झाली. सभेत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी आपण रामराजेंच्या पाठी मागे ताकदीने उभ राहिले पाहिजे असे आवाहन केले. त्याच वेळीस उपस्थितांनी गोंधळास सुरुवात करुन एकच दादा रणजित दादा...रणजित दादाच्या घोषणा दिल्या.

आठवले यांनी हो हो रणजितसिंह यांना निवडून द्यावे असे म्हणत ही सगळी निंबाळकर नावाची गडबड असल्याचे सांगून वेळ मारून नेली. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आदींची उपस्तिथी होती. आठवले यांच्या वक्तव्या वेळीस महसूलमंत्री पाटील मोबाईलवरुन काही तरी मुख्यमंत्री व मोहिते-पाटील या दोघांना दाखवित होते. त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांनी आठवलेंचे वक्तव्य ऐकले नव्हते. परंतु कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे त्यांच्यापर्यंत पोहचले.

Web Title: While Addressing Public Meeting Ramdas Athavle forgot Candidate Name