Loksabha 2019 : 'आप'चा मोहन जोशी यांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे: काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मोहन जोशी यांना आज “आम आदमी पार्टी, महाराष्ट्र” यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. एका पत्रकाव्दारे आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला.

पुणे: काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मोहन जोशी यांना आज “आम आदमी पार्टी, महाराष्ट्र” यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. एका पत्रकाव्दारे आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला.

मोहन जोशी यांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी लढत आहे. 'आप'ने पाठिंबा दिल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.

 ''आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील.'' ,असा आत्मविश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: AAP's support to Mohan Joshi