Loksabha 2019 : पवार कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : ''सव्वाशे कोटी जनतेचे पंतप्रधान अशा प्रकारे बोलतील हे कोणालाही वाटलं नव्हतं.तरुणांचे प्रश्न, बेकारी, महागाई, शेतीचे प्रश्न महिला, आदिवासी, भटके, कामगार प्रश्न देशात आहेत. पाच वर्षांपूर्वी ते विकासाचे मुद्दे बोलत होते, पण त्याला आता पूर्णपणे फाटा दिला आणि आमच्या घरावर उतरले. परिवाराचा प्रश्न आणि देशाच्या निवडणुकीच्या काय संबंध? , अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे काँग्रेस भवन येथे दिली. 

पुणे : ''सव्वाशे कोटी जनतेचे पंतप्रधान अशा प्रकारे बोलतील हे कोणालाही वाटलं नव्हतं. तरुणांचे प्रश्न, बेकारी, महागाई, शेतीचे प्रश्न, महिला, आदिवासी, भटके, कामगार प्रश्न देशात आहेत. पाच वर्षांपूर्वी ते विकासाचे मुद्दे बोलत होते, पण त्याला आता पूर्णपणे फाटा दिला आणि आमच्या घरावर उतरले. परिवाराचा प्रश्न आणि देशाच्या निवडणुकीच्या काय संबंध? , अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

पुण्यातील काँग्रेसचे उमदेवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचे आज भाषण होते. यावेळी त्यांनी काल वर्ध्यामध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि त्यांच्या घराण्यावर केलेल्या टीकेला आज प्रत्युत्तर दिले. 

''माझ्याकडून नकळत एक वक्तव्य बोललं गेलं, ती माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती. हे मी सगळीकडे सांगितलं. आत्मक्लेश केला. चव्हाण साहेबांच्या समाधी जवळ प्रायश्चित्त घेतलं. तरी देखील तेच पुन्हा उकरून काढतात. त्याचा आणि निवडणुकीचा काय संबंध? मी माफी मागितली होती ना! हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का? तोही देशांच्या पंतप्रधानांकडून? मला काही कळत नाही, त्यांना कोणी ब्रिफिंग केलं. शरद पवार आमचे दैवत, दैवताच्या विरोधात कोणी काही करेल का?
आम्ही आमचा पक्ष बघू ना !बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी, अडवाणी, वाजपेयी, गडकरी यांनी पक्ष चालवले आम्ही काही बोललो का? कीव येते, हा शब्द वापरणे योग्य नाही. कारण पंतप्रधानपद मोठे आहे.'' अशी प्रतिक्रिया  मोंदीनी अजित पवारावर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर म्हणून दिली. 

दरम्यान, ''मावळ गोळीबार प्रकरणात माझा सहभाग असल्याचे सिद्ध झाले तर राजकीय सन्यास घेईल' ,असे जाहीर सभेत सांगितले. ''हि निवडणूक महत्वाची आहे. मनात कोणत्याही किंतु, परंतु ठेऊ नका. कामाला लागा'' असे आवहाऩ कार्यकर्त्यांना करत ''विधानसभेच्या वेळी पवार आणि गांधी निर्णय घेतील'' असे देखील सांगितले.

Web Title: Ajit pawar answerd to modis allegation in pune