Loksabha 2019 : बापट यांचा सामना कोणाशी? 

Girish Bapat
Girish Bapat

पुणे : भाजपने अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कॉंग्रेस आता कोणाला उमेदवारी देणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. कॉंग्रेसचा निर्णय सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने उमेदवारी दिल्याने बारामतीमधील निवडणूक चुरशीची बनली आहे. जिल्ह्यातील पुण्यातील कॉंग्रेसचा उमेदवार वगळता चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता भाजपने पालकमंत्री बापट यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. भाजपमधील सर्व इच्छुकांना अगदी सहज मागे टाकत बापट उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले. पुण्यातून बापट यांच्यासोबत खासदार शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक मुरलीधर मोहोळ हे इच्छुक होते. मात्र राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यापासूनच बापट यांनी लोकसभेवर लक्ष केंद्रित करून मतदारसंघ बांधणीवर भर दिला. त्यातून त्यांना सहजपणे उमेदवारी मिळविणे शक्‍य झाले.

कॉंग्रेसमध्ये मात्र अद्यापही निष्ठावंतांकडून "आमचाच विचार करा', हा आग्रह धरण्यात आल्याने पुण्यातील उमेदवारीबाबत आजही निर्णय होऊ शकला नाही. इच्छुक उमेदवार गेली दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. ते आज पुण्यात परतले. मात्र, उमेदवारीवर आता सोमवारी किंवा मंगळवारीच निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने "सकाळ'ला सांगितले. कॉंग्रेसमधून माजी आमदार मोहन जोशी, प्रवीण गायकवाड आणि अरविंद शिंदे या तीन नावांमध्ये चुरस आहे. पुण्यातील जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याशिवाय विजयी होऊ शकत नाही, त्यामुळे उमेदवारीबाबत शरद पवार यांचे मतही महत्त्वाचे ठरणार आहे. मनसेचा पाठिंबाही पवार यांच्यावरच अवलंबून आहे. पवार यांनी गायकवाड यांच्या नावाचा आग्रह कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे धरल्याचे समजते. त्यामुळे गायकवाड, शिंदे की जोशी याबाबतची उत्सुकता वाढली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com