Loksabha 2019 : 'मुख्यमंत्री करताहेत 'फोडा आणि राज्य करा'चे राजकारण'

Baramati Agro CEO Rohit Pawar criticised Devendra Fadnavis
Baramati Agro CEO Rohit Pawar criticised Devendra Fadnavis

लोकसभा 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवर बोलायचे असेल तर त्यांना सुजय विखे, रणजीत मोहिते कशाला पाहिजेत?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे नातू आणि बारामती अॅग्रोचे सीईओ रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातली इतकी लोकं आहेत की त्यांची नावही आठवत नाहीत. त्यामुळे घराणेशाहीवर बोलताना तुम्ही कसं वागता हे देखील बघायला पाहिजे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

ते वाकड येथील स्थलांतरीत नागरिकांशी संवाद साधत होते. रोहित पुढे म्हणाले, '2014 ला भाजपचा अजेंडा हा केवळ विकास होता. त्यामुळे नागरिकांना देश पुढे जाईल, विकास होईल असं वाटलं होतं. मात्र, भाजपाने सोशल मीडियाचा वापर करुन खोट्या बातम्या पसरवल्या आणि त्यानंतर ते निवडून आले. मात्र, आता भाजपच्या नेत्यांच्या भाषणात ‘विकास’ हा शब्द येतोय का?'

नुकतेच कोल्हापूरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. ज्यात ते घराणेशाही, शरद पवारांवर बोलले पण विकासावर काही बोलले नाहीत. याच भाषणाबाबत फेसबुक पोस्ट द्वारे रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केले आहेत. तसेच केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर आज युती सोबत असणारे रणजीतसिंह मोहिते-पाटील, नरेंद्र पाटील, विनय कोरे, चंद्रदीप नरके, धैर्यशील माने, अतुल भोसले, सुजय विखे-पाटील यांनाही रोहित यांनी प्रश्न केले आहे. फडणवीस यांनी कोल्हापूरात म्हटले होते की, 'पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी समस्या सोडवण्याचं काम कधी केलं नाही.' 

यावर रोहित यांनी आज युती सोबत असलेल्या आधी उल्लेख केलेल्या नेत्यांना प्रश्न केला आहे. ते म्हणाले, 'जर पक्षाची चौकट म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विधानाला पाठिंबा देत असाल तर एकदा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील, सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे, कोल्हापूरचे जेष्ठ नेते डीसी नरके व बाळासाहेब माने, सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे-पाटील, सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपलं काय मत असणार आहे?' 

तसेच रोहित यांनी फडणवीस यांच्या धोरणाबाबतही टिका केली. ते म्हणाले, 'राजकारणाच्या नादात आपण आता 'फोडा आणि राज्य करा' असं धोरण स्वीकारत भांडण लावण्याचं काम करत असाल, तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपण करत असणाऱ्या राजकारणाहून दुर्देवी राजकारण दूसरं कोणतेच नसेल. मुख्यमंत्र्यांनी आता तरी फक्त कामाच्या‌ मुद्यावर बोलावं.'


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com