Loksabha 2019 : सत्ताधाऱ्यांना पराभूत करून सत्ता वंचितांच्या हाती देण्याच्या आमचा प्रयत्न : भीमराव आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

सत्ताधाऱ्यांना पराभूत करून सत्ता वंचितांच्या हाती देण्याच्या आमचा प्रयत्न आहे. वंचित समाज हा विकासापासून दूर राहिला आहे. हा सर्व घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबीपासून लांब राहिला आहे.'' असे भीमराव आंबेडकर म्हणाले.
 

पुणे :''पुण्यासह राज्यात काँग्रेस आणि भाजपचे दिग्गज उमेदवार आहेत. मात्र वंचित आघाडीने त्यांना घाम फोडला आहे. पुण्यातील दोन्ही उमेदवार एका सांस्कृतिमधून आले आहेत. त्या संस्कृतीने वंचितांना कधीच स्थान दिले नाही. सत्ताधाऱ्यांना पराभूत करून सत्ता वंचितांच्या हाती देण्याच्या आमचा प्रयत्न आहे. वंचित समाज हा विकासापासून दूर राहिला आहे. हा सर्व घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबीपासून लांब राहिला आहे.'' असे भीमराव आंबेडकर म्हणाले.

वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीची फुले वाडा येथून सुरुवात झाली आहे.  यावेळी  यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे बंधू भीमराव आंबेडकर सभेत बोलत होते.  

''काँग्रेस व भाजपने समाजकारणाचे राजकारण केले. माझ्या विरोधात गिरीश बापट आहेत की मोहन जोशी याचा विचार करित नाही. मेट्रोपेक्षा सवलतीच्या दरात घरे उभारणे गरजेचे आहे. विकासाचा भकास झाला आहे. आजही बहुजन समाज शिक्षणासह अनेक मूलभूत बाबींपासून वंचित आहे. त्यामुळे शिक्षणाचा व्यापार मोडून काढून केजी तो पीजी मोफत शिक्षण देणार आहोत'', असे उमेदवार अनिल जाधव यावेळी म्हणाले.

एमआयएमचे नेते अंजुम इनामदार, भारिपचे शहर अध्यक्ष अतुल बहुले, वसंत साळवे, बाबा साबळे, एमआयएमचे शहर अध्यक्ष लियाकत खान उपस्थित होते
 

Web Title: Bhimrao Aambedkar speaks about vanchit bahujan aghadi