कारणराजकारण : कोरेगाव भिमा शांत, त्याला अशांत करु नका : स्थानिक नागरिक

टिम ई सकाळ
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुणे : ''दंगलीनंतर आता कोरेगाव भिमा आणि आसपासच्या गावात शांतता आहे. मागील एक जानेवारीला विजयस्तंभ येथे झालेला कार्यक्रम अतिशय शांततेत झाला. समाजातील सर्व घटक एकजुट आहेत. आमच्यामध्ये शांतता असून तिला भंग करु नका.'' ,अशी अपेक्षा कोरेगाव भिमा परिसरातील स्थानिक नागरिक यांनी व्यक्त केली.

''दोन वर्षापुर्वी येथे झालेल्या प्रकारानंतर आमच्याकडे संशयाने पाहिले जात होते. मात्र, या घटनेत सर्वाधिक नुकसान आमचेच झाले होते. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. झालेली घटना दुःखद आहे. मात्र, आम्ही एकजुट असून या भागातील शांतता कायम ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आम्हाला ही घटना मागे सोडून विकासाची वाट धरुन पुढे जायचे आहे, येथील नागरिकांनी सांगितले. 

या भागात दोन मोठ्या एमआयडीसी असूनही स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही. त्याचबरैबर या भागामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. रांजणगाव, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, वाघोली या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मागील निवडणूक प्रचारामध्ये देखील हा प्रमुख मुद्दा होता. मात्र, गेल्या पाच वर्षामध्ये ही वाहतूक कोंडी न सुटता तो अधिकच गंभीर झाला आहे. 

Web Title: Caste and vote? Answers from Koregaon-Bhima