Election Results : मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे आघाडीवर

Election Results : मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे आघाडीवर

पुणे : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 69294 मतांची आघाडी मिळविली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने ही लढत प्रतिष्ठेची आहे. बारणे यांना पहिल्या फेरीनंतर 69294 मते मिळाली असून, पार्थ पवार यांना 55423 मते मिळाली आहेत.

दरम्यान, पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची चांगली ताकद असून, ते पवार यांच्या पाठिशी आहेत. भाजपनेही शिवसेनेच्या मागे ताकद उभी केली आहे. मात्र, पिंपरी व चिंचवड मतदारसंघात भाजपचे अनेक कार्यकर्ते पूर्वीश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे, त्यांच्यापैकी काहीजणांची पवार यांचा प्रचार केल्याची चर्चा आहे. 

बारणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा, आदित्य ठाकरे यांचा संवाद आदी कार्यक्रम झाले. 
राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com