आचार संहितेची तक्रार एका क्‍लिकवर

Election-Commission-Office
Election-Commission-Office
पुणे - लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग नागरिकांची मदत घेणार आहे. त्यासाठी आयोगाने "सीव्हीजील' ऍप विकसित केले आहे. त्याद्वारे नागरिकांना निवडणुकीतील अपप्रवृत्तीची माहिती प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी, या हेतूने निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, 'आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देण्यासाठी या ऍपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ काढून तो अपलोड करावा लागणार आहे. यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट आणि जीपीएस लोकेक्‍शन असणे आवश्‍यक आहे. फोटो अपलोड झाल्यावर त्या स्थानाचे लोकेशन संबंधित मतदारसंघातील भरारी पथकाला समजणार आहे. फोटो अपलोड केल्यावर वापरकर्त्याला एक युनिक आयडी मिळणार आहे. त्याद्वारे ते मोबाईलवर तक्रारीचा पाठपुरावा करू शकणार आहे.''

नागरिकांना हे ऍप सोमवारपासून (दि.11) मतदान समाप्त होईपर्यंत वापरता येणार आहे. या ऍपमध्ये आधी घेतलेले फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करता येणार नाही. त्यामुळे त्याचा गैरवापर होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तक्रारीचे शंभर मिनिटांत निवारण
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 63 पथके असणार आहे. या ऍपद्वारे आलेली माहिती या भरारी पथकाला पाच मिनिटांत मिळणार आहे. तक्रारी केलेल्या ठिकाणांपर्यंत 50 मिनिटात हे पथक पोचणार आहे. तक्रार योग्य असेल, तर 100 मिनिटांत तिचे निवारण होणार आहे.

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
निवडणुका शांततेत होण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत सुमारे 5 हजार 616 जणांवर ही कारवाई केली जाणार आहे. ग्रामीण हद्दीमध्ये सुमारे 3 हजार 822 नागरिकांकडे शस्त्र परवाने आहेत. जे नागरिक मतदारांवर प्रभाव पाडू शकतात, त्यांचे शस्त्र जमा करून घेतले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या महामार्गावर तपासणी नाके उभारले जाणार आहेत. जेणेकरून निवडणुकीमध्ये पैसे व मद्याचे वाटप आणि अवैध शस्त्रे जप्त करणे शक्‍य होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com