Loksabha 2019 : भाजपला उघडे पाडण्यासाठी काँग्रेसकडून व्यूहरचना

Loksabha 2019 :  भाजपला उघडे पाडण्यासाठी काँग्रेसकडून व्यूहरचना

पुणे - विरोधी पक्षाच्या उमेदवाराला प्रचारात नामोहरम करण्याची व्यहूरचना शहर काँग्रेसने आखली आहे. त्यासाठी आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ‘राष्ट्रवादी’ला बरोबर घेत भाजप उमेदवाराला प्रचाराच्या माध्यमातून उघडे पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेसकडून आखण्यात आलेल्या रणनितीमुळे निवडणुकीत रंग भरले जाणार असून त्याचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी मोहन जोशी, अरविंद शिंदे, अभय छाजेड आणि प्रवीण गायकवाड हे इच्छुक आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोहन जोशी यांच्या नावाला पसंती दिली आहे; तर  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अरविंद शिंदे यांचे नाव लावून धरले आहे. प्रदेशात एकमत न झाल्याने उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्यात आला आहे. आज सायंकाळी पक्षश्रेष्ठींबरोबर पुण्यासह महाराष्ट्रातील अन्य जागांवरील उमेदवारीबाबत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रात्री अथवा उद्या (मंगळवार) सकाळपर्यंत पुण्यातील उमेदवार निश्‍चित होईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पक्षाकडून उमेदवार निश्‍चित करण्यास वेळ लागत असला, तरी निवडणुकीत प्रचाराची रणनीती काय असावी, यावर शहर काँग्रेसकडून यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे. भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत बापट यांनी केलेली वादग्रस्त वक्तवे, त्यांच्याकडून झालेल्या चुका यावर प्रचारात भर दिला जाणार आहे. एकीकडे प्रचाराच्या नियोजनाबरोबरच दुसरीकडे प्रत्येक मतदारसंघातील वॉर्डस्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांना व्हिव्हिपॅडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून प्रचाराची दिशा निश्‍चत करण्यात आली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार असल्याचे शहर काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

प्रचार साहित्यांचे नव्याने दरपत्रक
जिल्हा प्रशासनाने उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे दर निश्‍चित केले होते. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेऊन पत्रकातील दरांची फेररचना करून नव्याने दर जाहीर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com