कारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)

Thursday, 18 April 2019

पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे. 

वानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा मुद्दा गंभीर असला तरी तो 5 वर्षात सुटेल एवढा लहान नाही. त्यासाठी भाजपला आणखी संधी द्यावी,' असे या भागातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या. 

वाहतुकीचा प्रश्न बऱ्याच लोकांनी बोलून दाखवला. 'आपल्याकडे व्यवस्था आहे पण अंमलबजावणी नाही, स्पीड ब्रेकर नाहीत,' असेही येथील नागरिक सांगतात. सामान्य लोकांना परवडेल अशा सुविधा जसं महागाई कमी करणे हे सरकारपुढे आव्हान असल्यचे नागरिकांनी मत व्यक्त केले.

पाच वर्षपुर्वीपर्यंत गॅसचा भाव परवडेल असा होता. पण गेल्या 5 वर्षात 900 ते 930 रुपये मोजवे लागत आहेत. अशा महागाईमुळे घरात कमावणारे दोघेही नसले महिन्याचं बजेट बिघडतं. महिला सुरक्षा नाहीच, पण या गोष्टीला केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर नागरिकांनी ही सजगता दाखवावी, असे मत वानवडीतील महिलांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with citizens at wanawadi area in Pune Cantonment Board