कारणराजकारण : तळेगावमधील डीआरडीओच्या प्रश्नांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

तळेगाव दाभाडे हे राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आ. बाळा भेगडे यांचे हे गाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गावाचा भेगडे यांनी तर कुठलाच विकास केला नाही तर, पाच वर्षांपासून शिवसेनेचा खासदार असूनही श्रीरंग बारणे यांचा मतदारसंघाच्या विकासासाठी उपयोग झाला नाही, असा आरोप करण्यात आला.

तळेगाव दाभाडे  : मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगावमध्ये 'कारणराजकारण'च्या मालिकेत येथील महत्वाच्या डीआरडीओच्या प्रश्नावर चर्चा झाली. भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रश्न संरक्षण मंत्री सोडवतील, असे सांगितले.

तळेगाव दाभाडे हे राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आ. बाळा भेगडे यांचे हे गाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गावाचा भेगडे यांनी तर कुठलाच विकास केला नाही तर, पाच वर्षांपासून शिवसेनेचा खासदार असूनही श्रीरंग बारणे यांचा मतदारसंघाच्या विकासासाठी उपयोग झाला नाही, असा आरोप करण्यात आला.

शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप खोडून काढताना तळेगाव दाभाडे भागात मोठी विकासकामे झाली असल्याचा दावा करण्यात आला. तळेगाव दाभाडे भागात वाहतूक समस्या असून तळेगाव शिक्रापूर मार्गावर होणारी जड वाहनांची वाहतूक हा मोठा प्रश्न आहे, हा प्रश्नही लवकरच सोडवण्यात येईल. सोबतच विकासकामे झाली असल्याचेही युतीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

पार्थ पवार यांच्या भाषणावरून त्यांना ट्रोल केले जाते यावर राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ''भाषणात काही नसते त्यांना मोठा अनुभव असून ते मोठी विकासकामे करतील. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.''

Web Title: Discussion on the DRDO issue in Talegaon