#कारणराजकारण : कुल यांच्या माहेरात भाजप राष्ट्रवादी आणि वंचितच्या समर्थकात रंगला कलगीतुरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल‌ यांचं माहेर वडगाव‌ निंबाळकर इथली परिस्थिती पाहायला गेल्यास इथे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आहेत आणि इथेच भाजप राष्ट्रवादी  आणि वंचित बहुजन आघाडी च्या समर्थकांत कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला.

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल‌ यांचं माहेर वडगाव‌ निंबाळकर इथली परिस्थिती पाहायला गेल्यास इथे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आहेत आणि इथेच भाजप राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी च्या समर्थकांत कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला.

पवार समर्थक आणि कुल समर्थक यांच्याशी आमनेसामने चर्चा केल्यानंतर मात्र एक गोष्ट लक्षात येते की, पवार समर्थक इथे मोठ्या प्रमाणावर असले तरी, इथे कांचन कुल यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. पण त्यांचे हे गाव माहेर आहे याचा त्यांना फायदा होईल असे सध्या चित्र दिसत नाही.

Web Title: discussion Vadgaon Nimbalkar People NCP BJP Kanchan Kul karanrajkaran