Election Results : शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ. कोल्हेंची ४९ हजार ३१६ मतांनी आघाडी

Election Results : शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ. कोल्हेंची ४९ हजार ३१६ मतांनी आघाडी

मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघातून दुपारी पावणे दोन वाजता मिळालेल्या आकडेवारी नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर या चार तालुक्यात आघाडीवर आहेत तर, शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील भोसरी व हडपसर मतदार संघातून आघाडीवर आहेत. 


 डॉ. अमोल कोल्हे शिरूर मध्ये १९ व्या फेरी अखेर १९ हजार ६८०, आंबेगाव मधून २२ व्या फेरी अखेर २२हजार ६३६, जुन्नर मधून १८ व्या फेरी अखेर ३३ हजार, खेड मधून २२ व्या फेरी अखेर चार हजार मतांनी आघाडीवर आहे. तर आढळराव पाटील भोसरी मध्ये २४ व्या फेरी अखेर २४ हजार मतांनी व हडपसरमध्ये २३व्या फेरी अखेर ६ हजार ३००मतांनी आघाडीवर आहेत.

एकंदरीत डॉ. कोल्हे हे सद्यस्थितीत ४९ हजार ३१६ मतांनी आघाडीवर आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com