Loksabha 2019: निवडणूक निकालाआधीच डॉ. अमोल कोल्हे खासदार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

शेलपिंपळगाव (ता.खेड) येथील एकाने तर चक्क लग्नपत्रिकेवर अमोल कोल्हे यांचा खासदार, शिरूर लोकसभा म्हणून प्रमुख उपस्थितीमध्ये उल्लेख केला आहे. येत्या ता. 8 मेला हा विवाह सोहळा होणार आहे.

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर येत्या 23 मे रोजी मतमोजणी आहे. त्यानंतर निकाल कुणाच्या बाजूने हे कळणार आहे. पण त्याआधीच इच्छुक कार्यकर्ते आमचा उमेदवार निवडून येणार आहे असे सांगत आहेत. सोशल मिडीयावरही एवढ्या मताधिक्क्याने येणार असे सांगत आहेत.

शेलपिंपळगाव (ता.खेड) येथील एकाने तर चक्क लग्नपत्रिकेवर अमोल कोल्हे यांचा खासदार, शिरूर लोकसभा म्हणून प्रमुख उपस्थितीमध्ये उल्लेख केला आहे. येत्या ता. 8 मेला हा विवाह सोहळा होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार याची गणिते सोशल मिडीयावर फिरत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विजय आपलाच आहे, अशा गप्पा मारत आहेत. मतदारसंघात तेरा लाखावर मतदान झाले असताना कुणाची लाट होते की, कोणाच्या पारड्यात अधिक मते जातात हे पाहणे महत्वाचे आहे. निकालावर अनेकांच्या लाखो रूपयांच्या पैंजाही लागल्या आहेत. एकंदरीत ग्रामीण भाग, निमशहरी, शहरी भागात झालेल्या मतदानावर दोघा उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol Kolhe names as MP Marriage invitation goes viral