Loksabha 2019 निकालाआधीच भाजपचा पराभव; हर्षवर्धन पाटील यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे : "पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे मतदान होण्यास दोन दिवसांचा कालवधी राहिला असताना भाजपकडून 'संकल्पपत्र' जाहीर करण्यात आले आहे. संकल्पपत्रास विलंब होण्यामागे देशातील वातावरण आपल्यासाठी ठीक नाही, हेच कारण आहे. यावरून निकालाआधीच भाजपचा पराभव झाला आहे,'' असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता. 9) येथे पत्रकार परिषदेत केला.

"इव्हिएम मशिन बद्दलच फक्त भिती आहे. त्यामुळे सतर्क राहावे लागणार आहे,' असेही ते म्हणाले.काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. पुण्यात देखील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा विजय नक्की होईल, असेही ते म्हणाले. पाटील म्हणाले, " भाजपाच्या संकल्पनाम्यात कोणते धोरण नाही. दिलेले कोणतेही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे हा संकल्पनामा थातूर-मातून आहे. देशातील वातावरण बदल आहे. लोकांनाचा भ्रमनिराश झाला आहे. समाजातील कोणताही घटक सरकारबद्दल समाधानी नाही. गेल्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्‍वासने कागदावरच राहिल्या आहेत.'

काँग्रेस आघाडीसाठी राज्यातील वातावरण अनुकूल आहे, असा दावा करून पाटील म्हणाले," जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे.ईव्हिएम मशिनबद्दल फक्त भिती आहे. निवडणूका पारदर्शी पद्धतीने पार पडल्या पाहिजेत, त्यासाठी सतर्क राहावे लागणार आहे आणि बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे.''

Web Title: Harshavardhan Patil's claim about BJP defeate before result