हर्षवर्धन पाटील यांची समन्वयकपदी निवड

Harshwardhan-Patil
Harshwardhan-Patil

पुणे - पुणे शहर, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने जिल्ह्यातील नेते हर्षवर्धन पाटील यांची समन्वयक म्हणून गुरुवारी नियुक्ती केली. 

पुणे, सोलापूरमध्ये काँग्रेस, तर माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून समन्वयक म्हणून पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार तिन्ही लोकसभा मतदारसंघांत आघाडीतील पक्षांशी समन्वय साधणे, प्रचार मोहिमांचे नियोजन करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, आदी जबाबदाऱ्या पाटील पार पाडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com