Loksabha 2019 : जनता दलाचा डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

गुनाट( शिरूर) :  शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना जनता दल (सेक्‍युलर) पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली

गुनाट( शिरूर) :  शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना जनता दल (सेक्‍युलर) पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली. 

नव्वदच्या दशकात या मतदारसंघावर मोठा प्रभाव असलेल्या जनता दलाच्या पाठिंब्यामुळे कोल्हे यांना चांगलेच पाठबळ मिळणार आहे. खेड मतदारसंघात 1989 मध्ये जनता दलाचे किसनराव बाणखेले निवडून आले होते, तर बाणखेले यांनीच जनता दलाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्‍यातून तीन वेळा आमदारकी भूषविली होती. त्यांच्या माध्यमातूनच खेड आणि जुन्नर तालुक्‍यात जनता दलाला मानणारा मोठा वर्ग आहे, तर हडपसर पट्टा हा जनता दलाचा हक्काचा विभाग असून एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, यासारखे कट्टर नेत्यांच्या बाळकडूमुळे आजही या भागात या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व मतदार आहेत.

शिरूर विभागात महाराष्ट्र जनता दल युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, जिल्हाध्यक्ष संजय बारवकर तर भोसरी येथे माजी जिल्हाध्यक्ष गेनुभाऊ अल्हाट यांनीही पक्षाची मोट बांधून ठेवली आहे. नाथा शेवाळे व संजय बारवकर यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. 
 

Web Title: Janata Dal's Dr. Support for Amol Kolhe