Loksabha 2019 : सोबत आहे महायुती, मग कशाला कोणाची भिती : कांचन कुल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद पाठिशी आहे. सर्व घटक पक्ष पाठीशी आहेत. कार्यकर्त्यांची ताकद सोबत आहे. "मग कशाला कोणाची भिती, सोबत आहे महायुती"  अशी प्रतिक्रिया कांचन कुल यांनी देत मतदानाचे सर्वांना आवाहन केले. 

आज (ता. 2) बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल व पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी निवडणूकीसाठी अर्ज भरला. यावेळी कांचन कुल गुजराती हायस्कुलपासून मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या. नरपगिरी चौकात झालेल्या जाहीर सभेत 'त्या' बोलत होत्या. 

या वेळी पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळेही, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे उपस्थित होते. पुण्याचे ग्रामदैवत व मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन बापटांनी अर्ज भरला. पुण्यातील वातावरण हे सकारात्मक व चांगले आहे. अर्ज भरण्यासाठी सुरू झालेल्या या मिरवणुकीत महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थितीत होते. तसेच काही दिवसांपूर्वी बंडाचे निशाण उभे केलेले आहे. खासदार संजय हे ही या मिरवणूकीत सहभागी झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanchan kool speaks about alliance in pune