Loksabha 2019 : कसबा माझ्यासाठी देव घरासमान : बापट

Girish Bapat
Girish Bapat

पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे प्रेम करणाऱ्या येथील जनतेही आणि कार्यकर्त्यांची आहे. कसबा हा केवळ माझ्यासाठी मतदार संघ नसून कसबा हे माझ स्फूर्ती स्थान, घर आणि त्यापुढे जाऊन सांगायचे झाल्यास देवघरासमान आहे.” अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी कृतज्ञता भाव व्यक्त केला.

प्रचाराची सांगता सभा आज कसबा गणपती समोर पार पडली. यापूर्वी कसब्यातून प्रचार यात्रा काढली या यात्रेची सुरुवात समताभूमीपासून झाली. नाना पेठ, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, नवी पेठ, दत्तवाडी, सारसबाग, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे ही प्रचार यात्रा कसबा गणपतीजवळ या यात्रेचा शेवट करण्यात आला. यावेळी कसबा मंदिराजवळ झालेल्या सभेत ते  होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक राजेश येनपुरे, विशाल धनवडे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, धिरज घाटे, हेमंत रासने, सुलोचना कोंढरे, गायत्री खडके, योगेश समेळ, विष्णू आप्पा हरिहर, माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी, भारत निजामपुरकर, संजय देशमुख, प्रमोद कोंढरे, राजू परदेशी, वैशाली नाईक, छगन बुलाखे, मदिना तांबोळी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

बापट म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून कसब्यातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्याची मला लाभलेली संधी ही ईश्वर सेवाच आहे असे मी समजतो. कसब्या सारख्या मतदार संघातून २५ वर्षे आमदारपदी काम केले. यात माझे श्रेय अजिबात नाही. आमदार एक कार्यकर्ता म्हणून दमदारपणे काम करत असेल तरच तो जनतेच्या विश्वासास पात्र ठरतो. या वाटेवर चालण्याचा मी प्रयत्न केला. ‘अटलजींच्या एका वाक्याने मला प्रभावित केले. ज्यावेळी हा देव मला अस्पृश्यता पाळायला लावेल, तेव्हा मी त्यालाही मानणार नाही.’ त्यानुसार वैयक्तिक किंवा राजकीय जीवनात मी कधीच अस्पृश्यता पाळली नाही. माझ्या दरात आलेला प्रत्येक माणूस हा देवाचाच अंश आहे असे समजून मी काम केले. 

लोकसभेच्या पायऱ्या मोदी चढताना पुण्याचे सुसंस्कृत आणि सात्विक नेतृत्व असलेल्या गिरीश बापट यांना मोदींची सावली म्हणून पाठवावे, असे आवाहन ढोबळे यांनी केले. तर महापौर, उपमहापौर  यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. दरम्यान, आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरात सर्व ठिकाणी प्रचार यात्रा काढण्यात आल्या. प्रचारफेरी, सभा आणि वैयक्तिक भेटीगाठीवर बापट यांचा भर होता. पुणे कॅन्टोमेंट आणि वडगाव शेरी भागातही त्यांनी प्रचारफेरी काढली. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उमेश गायकवाड, अर्चना पाटील, मनीषा लडकत,दिलीप गिरीमकर, अतुल गायकवाड, प्रियांका श्रीगिरी, धनराज घोगरे, मंगला मंत्री, पल्लवी जावळे, लता धायरकर या नगरसेवकांसह अजय भोसले, संजय काटे, गणेश यादव, अशोक खंडागळे, गणेश यादव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रिटीश गेला अन कॉंग्रेस आला.
या देशाचे तुकडे करण्यापासून ते या देशात जाती-धर्मात भांडण लावण्याच काम गोऱ्या ब्रिटीशाने केल. १५० वर्षे राज्य करून ते गेले पण त्यांच्याच मनसुब्यांना खतपाणी घालण्याचे काम कॉंग्रेसने आजवर केल. ब्रिटीश गेला अन देशात अशांतता पसरायला कॉंग्रेसच्या रूपाने तो पुन्हा आला. अशा शेलक्या शब्दांत आरोप बापट यांनी विरोधकांवर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com