Loksabha 2019 : मराठा मोर्चाचे काँग्रेसला बळ ; कुंजीर, भोसले, दुधाणेंचा प्रवेश

Jijau_Brigade_300319.jpg
Jijau_Brigade_300319.jpg

पुणे : मराठा मोर्चा आणि मराठा समन्वय समिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मराठा सेवा संघ आणि मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा मोर्चातील कार्यकर्त्यांचे बळ मिळाले आहे. 

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गायकवाड यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रीय निरीक्षक वेणु प्रसाद गोपाल यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गायकवाड आणि कुंजीर यांच्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्षा सारिका भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष प्राची दुधाणे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय पुणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या 200 ते 250 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी जे भव्य मोर्चे निघाले, त्यात या नेत्यांचा समन्वयक म्हणून महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे मराठा मोर्चाचे बळ आता काँग्रेसला मिळणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com