Lokdsabha 2019 : आघाडीकडे प्रचाराचे मुद्देच नाहीत : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पिंपरी : "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नाहीत,'' अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली. मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे प्राधिकरणातील कार्यालयात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठाकरे म्हणाले, "आघाडीसोबत असलेली नेतेमंडळी जम्मू काश्‍मीरमध्ये 370 कलम तसेच ठेवणार असल्याचे सांगत आहेत. त्यांची सत्ता आल्यास देशात आणखी एक पंतप्रधान देशात होईल. ते लोकांना नको आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहे. त्यात महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. राज्यात 48 ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी होतील. राज्यात सगळीकडे भगवा रंग नजरेस पडत असून, कमळ आणि धनुष्यबाण ही दोनच चिन्हे प्रचारात उठून दिसत आहेत. मतदारांशी संवाद साधण्यासाठी प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होत आहे. त्या ठिकाणी युतीचाच बोलबाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युतीला घवघवीत यश मिळेल.'' 
 
Web Title: Leading party don't have any issue for campaigning : Aditya Thackeray