#Loksabha2019 : मनसेचा डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

शिरूर : डॉ. अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत आघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याचा निर्णयही मनसेने घेतला आहे. 

शिरूर : डॉ. अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत आघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याचा निर्णयही मनसेने घेतला आहे. 

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, तालुका संघटक रवींद्र गुळादे, शहर अध्यक्ष संदीप कडेकर, माजी शहर अध्यक्ष सुशांत कुटे यांनी याबाबतचे लेखी पाठिंब्याचे पत्र राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषिराज अशोक पवार यांच्याकडे दिले. या वेळी 'राष्ट्रवादी'च्या वतीने माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण यांच्या हस्ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मोदी-शहा यांच्याविरोधात राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले असून, भाजप-शिवसेना उमेदवाराच्या विरोधात शक्ती दाखवून देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त झाल्याने आम्ही शिरूर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांना पाठिंब्याचा निर्णय घेतला, अशी माहिती कुटे यांनी दिली. मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. कोल्हे यांचे एकदिलाने काम करतील, अशी ग्वाही रवी गुळादे यांनी दिली. 

Web Title: Loksabha 2019 : MNS Dr. Support for Amol Kolhe