Loksabha 2019 : राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांची ज्या ठिकाणी सभा झाली त्या वर्धातच गांधीची सभाही होणार आहे. वर्धापाठोपाठ ते पुण्यातही येत्या 5 एप्रिलला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 

2014 मध्ये देखील मोदी यांनी वर्धा येथे पहिली सभा घेऊन भाजप-शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्या वेळी मोदी यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. या वेळीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथून युतीच्या प्रचाराला सुरुवात केली; मात्र वर्धा येथील त्यांच्या सभेला फारशी गर्दी जमली नाही. सभेला मिळालेल्या अल्पप्रतिसादाची चर्चा राजकीय वर्तुळासह माध्यमांतदेखील झाली. त्यामुळे गांधी यांच्या राज्यातील पहिल्याच सभेला कसा प्रतिसाद मिळणार याबाबत उत्सुकता आहे. 

राहुल हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांशी सकाळी दहा वाजता संवाद साधणार आहेत. त्याचा सविस्तर कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. पुण्यात काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण असून गांधी यांच्या पुणे दौऱ्याने कार्यकर्त्यांमधील जोश आणखी वाढेल, अशी शक्‍यता काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. 
 
Web Title: Loksabha 2019 : Rahul Gandhi will interact with students in Pune