Loksabha 2019 : संजय काकडेंना गांभीर्याने घेत नाही : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

  • सुप्रिया सुळे यांनी केले संजय काकडेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष 
  • लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार : सुळे
  • कांचन कुल अतिशय चांगली आणि सुसंस्कृत मुलगी
  • प्रचारात विकास हाच मुद्दा

पुणे : ''आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच काकडे यांना देखिल मत मांडण्याचा आहे.'' अशी प्रतिक्रिया देत संजय काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ''सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू' असे वक्तव्य काकडेंनी केले होते. यावक्तव्याबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे यांनी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 

''मी काचंनला कित्येक वर्षांपासून ओळखते. अतिशय चांगली आणि सुसंस्कृत मुलगी आहे.'' असे मत त्यांनी कांचन कुल यांच्याबाबत दिले.

'मी विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण करते. विकासाचे मुद्दे हेच माझे प्रचाराचे मुद्दे असतील.'' असेही त्यांनी यावेळी सांगितले.शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा हे देशापुढील प्रमुख प्रश्न व आव्हाने आहेत. हे प्रश्न घेऊन आम्ही जनते समोर जाणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धायरी येथे प्रचार दरम्यान त्यांनी 'सकाळ' सोबत संवाद साधला. 
(व्हिडिओ -विठ्ठल तांबे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019: Supriya Sule does not take seriously sanjay kakade's comment