Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

Loksabha 2019 : मुख्यमंत्र्यांची नगरसेवकांवर ‘नजर’

पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रचारात सक्रिय आहेत की नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे.

नगरसेवकांनी आपापल्या भागात प्रचाराची जबाबदारी पार पाडून त्या संदर्भातील रोजचा अहवाल छायाचित्रासह स्थानिक आमदार व मुख्यमंत्र्यांना द्यावा लागत आहे. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून लांब पळायला संधीच राहिलेली नाही.

महायुतीच्या जागावाटपात शहराचा समावेश असलेले मावळ व शिरूर मतदारसंघ शिवसनेनेच्या वाट्याला आहेत. मात्र या मतदारसंघांतून अनुक्रमे भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे इच्छुक होते. यामुळे त्यांनी दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी केली होती. मात्र महायुतीच्या धर्मपालनानुसार जागावाटप बदलणे अशक्‍य होते. परिणामी, जगताप व लांडगे यांनी बंड पुकारले. शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दापुढे दोघांनाही नमते घ्यावे लागले. सध्या दोघेही शिवसेना उमेदवारांचा प्रचारात सक्रिय आहेत. परंतु त्यांच्या भूमिकेबाबत अनेक जण साशंक आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुचविलेल्या आखणीसुसार प्रचाराची आणखी केली असून, त्यानुसार प्रचार सुरू आहे.

...अशी आहे व्यूहरचना
शहरात १२८ पैकी भाजपचे ७८ व शिवसेनेचे नऊ नगरसेवक आहेत. त्यांची विभागणी पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा क्षेत्रात आहे. पिंपरीत शिवसेनेचे ॲड. गौतम चाबुकस्वार आमदार आहेत. भोसरीचे नेतृत्व भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे व चिंचवडचे प्रतिनिधित्व भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप करीत आहेत. त्यांच्यावर आपापल्या भागातील प्रचाराची जबाबदारी आहे. नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. चार सदस्यांचा वॉर्ड असल्याने सोयीनुसार नगरसेवकांनी भाग वाटून घेतले आहेत. त्यानुसार कोपरा सभा, बैठका सुरू आहेत. त्यासंदर्भातील छायाचित्रे आमदार व मुख्यमंत्र्यांना पाठवत आहेत. मोठी मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, सोसायट्यांचे अध्यक्ष यांच्यासोबत वॉर्डातील पक्षाचे नगरसेवक एकत्रित बैठका घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com