Loksabha 2019 : बापट यांना ३ लाख मतांनी निवडून आणू - काकडे

Sanjay-Kakade
Sanjay-Kakade

पुणे - भाजपचे लोकसभेचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांचे राजकारणातील स्पर्धक व उमेदवारी मिळविण्यात अपयश आल्याने नाराज झालेले खासदार संजय काकडे यांची आज सकाळी घरी जाऊन भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या प्रचाराबद्दल चर्चा झाली. तसेच, बापट यांना तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्‍याने निवडून आणू, असे आश्‍वासन काकडेंनी दिले.

पुण्यात भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी बापट, काकडे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह इतर इच्छुक होते. अखेर बापट यांनी उमेदवारी खेचून आणली. त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या भेटीत बापट यांनी काकडे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्या वेळी काकडे यांनी मी नाराज नाही, तुमचा प्रचार करून तुम्हाला तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्‍याने निवडून आणणार, असे बापट यांना आश्‍वासन दिले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील जागा जिंकू
पश्‍चिम महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती वगळता नऊ मतदारसंघांत महायुती जिंकणार अशी सध्याची स्थिती आहे. पुढील काही दिवसांत बारामतीही जिंकण्याचे नियोजन करू. यात बारामतीतून एक लाखाच्या मतांनी भाजपचा उमेदवार निवडून येईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीखातर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, असे काकडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com