Loksabha 2019 : लक्ष्मण जगताप यांना सहकार्याची विनंती बारणे

laxman-and-shrirang
laxman-and-shrirang

पिंपरी - भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि माझ्यामध्ये या अगोदर आरोप-प्रत्यारोप झाले होते, त्याला पूर्णविराम देण्यासाठी मी त्यांना भेटलो. आपसांतील हेव्यादाव्यांमुळे इतरांना फायदा होऊ नये, म्हणून सहकार्य करण्याची विनंती त्यांना केली असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे उपस्थित होते. 

मावळमधून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून आपण निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे जगताप यांनी सहकार्य करण्याचे आवाहन बारणे यांनी या वेळी केले. 

निवडणुकीच्या प्रचारातील मुद्‌दे हे गेल्या पाच वर्षांमध्ये मावळ मतदारसंघामध्ये केलेल्या विकासकामावरच राहणार आहे. पाच वर्षांत या मतदारसंघामध्ये आपण जनतेशी जोडले गेलो आहोत. केंद्र आणि राज्य सरकारने राबवलेल्या योजना जनतेपर्यंत पोचविल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये उत्साह दिसत आहे. मावळ मतदारसंघामध्ये अडीच लाख नव्या मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

२०१४ मध्ये या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. १९९९ पासून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढत असल्याचे सांगताना मावळ मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत नसल्याचे बारणे यांनी नमूद केले.

शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेनेची वाट धरली आहे. त्यामुळे निवडणुकीत दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍याने विजयी होऊ, असा विश्‍वास बारणे यांनी व्यक्‍त केला. पवना जलवाहिनीचे पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. स्थानिक शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता हा निर्णय घेतला गेला. नियोजनशून्य कारभारामुळे ही योजना रखडली असून, पालिकेचे कोट्यवधी रुपये पडून आहेत. 

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी भेट घेतली. या वेळी या दोघांमध्ये मनोमिलनाच्या विषयावर चर्चा झाली. याबाबत बारणे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगत यावर मौन बाळगणे पसंत केले.

निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात येणार असल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले. आतापर्यंत उरण, कर्जत, खालापूर, पनवेल या भागांत पहिल्या टप्प्यातला प्रचार पूर्ण केला आहे. पनवेलमध्ये सव्वापाच लाख मतदार आहेत, त्यामुळे याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com