Loksabha 2019 : पार्थ पवार यांच्या प्रचाराचा आज मावळात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

वडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त अभीष्टचिंतन सोहळा, तसेच पार्थ पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ बुधवारी येथे होणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली. 

येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले व माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते सत्कार व प्रचाराचा प्रारंभ होईल. 

या प्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक रमेश साळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माउली दाभाडे, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब नेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर, शेकापचे माउली तळावडे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Parth Pawar Publicity Politics