Loksabha 2019 : आम्ही जनतेला वाटतोय समृद्धी - प्रकाश जावडेकर

कोथरूड - भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची सभा शिक्षकनगर येथील मैदानात मंगळवारी झाली.
कोथरूड - भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची सभा शिक्षकनगर येथील मैदानात मंगळवारी झाली.

पुणे - देशाचा विकास होऊ नये, असे धोरण काँग्रेसने तयार केल्याने गरिबी वाढली. काँग्रेसने गरिबी तयार करून ती वाटली. पण, आम्ही समृद्धी तयार करून वाटत आहोत. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक विकासासाठी, सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना संधी दिली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

कोथरूडमधील शिक्षकनगर येथे आयोजित केलेल्या सभेला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शशिकांत सुतार, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, श्‍याम देशपांडे आदी उपस्थित होते. 

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ‘अभिनंदन’ या शब्दाचा अर्थ बदलून गेला आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले, ‘‘आम्ही ‘भारत माता की जय’ हे प्रत्येक सभेत म्हणतो. देश आम्हाला प्रथम आहे. त्यावर आम्ही राजकारण करत आहोत, असा आरोप केला जातो. जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्यांना काँग्रेसने पाठीशी घातले, ही बाब विसरता येणार नाही.’’   

जावडेकर म्हणाले, ‘‘गरिबी नाहीशी होण्यासाठी समृद्धी निर्माण झाली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने असे नियम केले की त्यामुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे गरिबी वाढली. पण आता गरिबी झपाट्याने कमी होत आहे. सरकारच्या धोरणांमुळे गरिबांचे सक्षमीकरण होत आहे. जनतेला सुशासन, प्रगती आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत सरकार आवश्‍यक असल्याने मोदी यांना दुसरी संधी देण्यासाठी ही निवडणूक आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com