Loksabha 2019 : पुण्यातील निवडणूक प्रतिष्ठेची - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

पुणे - ‘‘गेल्या दहा-वीस वर्षांपासून शहरात केवळ डीपी, मेट्रोसह इतर कामांची चर्चा होती. परंतु गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्याचा विकास आराखडा मंजूर केला असून, मेट्रोचे काम सुरू आहे. यासह विविध कामे सुरू आहेत. यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली असून, ही निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे,’’ असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. 

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने बापट यांना उमेदवारी दिली आहे. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गुणवत्ता व निवडून येण्याच्या क्षमतेमुळे पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. 

भाजप, शिवसेना, रिपाइं युती अभेद्य असल्याने आम्ही प्रचंड मताधिक्‍याने पुण्याची जागा जिंकणार आहोत. महापालिकेपासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर पाच वेळा आमदार झालो. आता लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होतो. पुण्यातील निवडणूक ही विचारांची लढाई आहे.’’

कोठेही शांततेला बाधा येऊ नये. सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. हजारो सक्षम कार्यकर्ते ही माझी जमेची बाजू आहे. त्यांच्याच मदतीने मी मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

बापट यांचे जंगी स्वागत 
लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव जाहीर होताच जंगली महाराज रस्त्यावरील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बापट यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. 

बापट यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या शनिवार पेठेतील घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बापट यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बापट हे शहर कार्यालयात आले, त्या वेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. उमेदवारी नाकारल्याने खासदार अनिल शिरोळे हे नाराज असतील. त्यामुळे पक्ष कार्यालयात आले नसावेत, अशी चर्चा सुरू होती, पण दिल्लीवरून पुण्यात येताच त्यांनी थेट पक्ष कार्यालय गाठून बापट यांना शुभेच्छा दिल्याने वातावरण बदलून गेले. तसेच भाजपचे सर्व आमदार, शिवसेना, रिपाइंचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.

संजय काकडे यांच्याकडे ‘क्रीम रोल’
भाजपने संजय काकडे यांच्याकडे पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. त्यात पुण्याचाही समावेश असल्याने त्यांचा निवडणुकीत काय रोल असेल?, असे बापट यांना विचारले असता, ‘‘काकडे यांचा क्रीम रोल असेल,’’ असे विनोदी उत्तर त्यांनी दिले. ‘‘पक्ष प्रत्येकाला जबाबदारी देत असतो. ती प्रत्येकाने सक्षमपणे पार पाडवी. मी हातात हात घालून सर्वांसोबत काम करणार असून, कुणाच्याही पायात पाय घालणार नाही,’’ असेही बापट म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Pune Politics Girish Bapat