Loksabha 2019 : तडाखेबंद प्रचाराने जबरदस्त चुरस

Shirur-Constituency
Shirur-Constituency

शहरी उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिक ते वाड्या-वस्त्यांवरील ग्रामीण बांधव आणि दुर्गम भागातील आदिवासी, अशा संमिश्र रचनेच्या शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावी चेहरा, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरस आहे. दोन्ही बाजूंच्या तडाखेबंद यंत्रणेमुळे ‘काँटे की टक्कर’ आहे.

बैलगाडा शर्यतीभोवती फिरणाऱ्या शिरूर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा विविध विषय अग्रस्थानी आहेत. साठ टक्के ग्रामीण आणि चाळीस टक्के शहरी, अशा या मतदारसंघात मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या आदिवासी पाड्यांबरोबरच आयटीपासून बकालपणात भर टाकणाऱ्या पंचतारांकित एमआयडीसीचाही अंतर्भाव होतो. शिवरायांचा शिलेदार’ हे बिरूद लावूनच शिवाजीराव आढळरावांनी तीन निवडणुका जिंकल्या. या वेळी ‘शिवरायांचा सच्चा मावळा’ म्हणत डॉ. अमोल कोल्हेंनी भावनिक साद घालून ‘एन्ट्री’ केल्याने चुरस वाढलीय. रिंगणात २३ उमेदवार असले, तरी लढत सरळच आहे.

शिरूर मतदारसंघाचे आढळरावांनी तीनदा नेतृत्व केलेय. विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीतील आढळरावांसमोर राष्ट्रवादीने चाणाक्षपणे डॉ. कोल्हेंच्या रूपाने भेदक गोलंदाज दिलाय. डॉ. कोल्हे लोकप्रिय असले, तरी त्यांची लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे; तर डॉ. कोल्हेंच्या पक्षांतरामुळे इरेला पेटलेल्या शिवसैनिकांना भाजप कार्यकर्त्यांच्या बूथनिहाय यंत्रणेचे बळ मिळाले आहे. राज्यातील प्रचार संपल्याने मुख्यमंत्री फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्या तोफा येथे धडाडतील. त्याने मोठी राजकीय घुसळण होईल, हे खरेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com