Loksabha 2019 : प्रचारासाठी अवघे ६० तास

Shivsena-NCP
Shivsena-NCP

पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अवघे ६० तास उरले आहेत. त्यामुळे महायुती व महाआघाडीसह अन्य उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांच्या जाहीर सभा, कोपरा सभा, बैठका, भेटीगाठी, पदयात्रा यावर सर्वच पक्षांचा भर आहे. सर्वांसाठी एक-एक मििनट महत्त्वाचा असून, नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही प्रचाराचे काउंटडाऊन सुरू केले आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर व बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी (ता. २३) मतदान झाले. उरलेल्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. २९) मतदान आहे. आचारसंहितेनुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबवावा लागणार आहे. यामुळे उरलेल्या ६० तासांतील प्रचाराचे गणित सर्वच नेत्यांनी मांडले आहे.

महाआघाडीतर्फे अनुक्रमे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि महायुतीतर्फे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली आहे. यामुळे पवार कुटुंबासह शिवसेना आणि केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याकरिता भारतीय जनता पक्षासाठी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे आहेत. त्यादृष्टीने प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याची धडपड नेत्यांनी सुरू केली आहे. त्याची झलक बुधवारी शहरात दिसून आली.

महायुतीची धडपड
महायुतीतील शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर व मावळचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी पक्षातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मोरवाडीत बैठक घेतली. शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांची दापोडीत सभा झाली. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चौकात ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमातून मतदारांशी संवाद साधला. बोपखेल, दापोडी, कासारवाडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागांत कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढून प्रचार केला.

आज होणाऱ्या सभा
महाआघाडीतर्फे गुरुवारी (ता. २५) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या काळेवाडीत सभा होणार आहेत. तर, महायुतीतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपनेत्या नीलम गोऱ्हे यांची काळेवाडी फाटा येथील मैदानात जाहीर सभा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com