Loksabha 2019 : मावळ तालुक्‍यात पदाधिकाऱ्यांच्या हाती प्रचाराची धुरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

लोणावळ्यात संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन
पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, मनसेचे शहराध्यक्ष भारत चिकणे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष बाबा ओव्हाळ, ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ गवळी, सुबोध खंडेलवाल, दीपक मानकर उपस्थित होते. गवळीवाडा येथील श्रीराम मंदिर येथे संयुक्त प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सोमवारी दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बैठका व गावभेटीचा दौरा करून मतदारांशी संपर्क साधला.

युतीचा पवन मावळात दौरा
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी येळसे, महागाव, पवनानगर, लोहगड, औंढे-औंढोली, कुसगाव आदी गावांमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. काही गावात घोंगडी बैठका घेऊन मार्गदर्शन केले. आमदार बाळा भेगडे, रुपलेखा ढोरे, गणेश भेगडे, प्रशांत ढोरे, राजू खांडभोर, लक्ष्मण भालेराव, रामनाथ वारींगे, बाळासाहेब घोटकुले, गुलाबराव म्हाळसकर, अलका धानिवले, सुवर्णा कुंभार, जिजाबाई पोटफोडे, अमित कुंभार,मदन शेडगे आदी उपस्थित होते.

तळेगावात कामगार मेळावा
आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी इंटकप्रणीत कामगार संघटनेतर्फे मेळावा घेतला.२५ कंपन्यांचे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय काळोखे, गोविंद मोहिते, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब ढोरे उपस्थित होते. संघटनेने आघाडीच्या जिल्ह्यातील चारही उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केला.

पार्थ यांचा पवन मावळात प्रचार
पवनानगर : आघाडीचे उमेदवार पार्थ यांच्या प्रचारासाठी महागाव, काले, ब्राम्हणोली, वारू, कोथुर्णे, मळवंडी ठुले, ठाकुरसाई, तिकोणापेठ व अजिवली गावात गावभेट दौरा झाला. मावळचा विकास खुंटला असून, अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यासाठी मत द्यावे, असे आवाहन पार्थ यांनी केले. बाळासाहेब नेवाळे, विजय कोलते, रमेश साळवे, गणेश ढोरे, गणेश खांडगे, महादू कालेकर, नामदेव ठुले, खंडुजी तिकोणे उपस्थित होते.

भाजपचा लोणावळ्यात मेळावा
लोणावळा : शहर भाजपच्या वतीने वर्धापन दिन व विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. राजेंद्र शर्मा, भावीन कपाडिया, श्रेयस खंडेलवाल, भावेश रूपावत, गौरव लवाटे, सोनाली लक्ष्मण दळवी, सुनीता संजय साखरे आदींसह सव्वाशे पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शहराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली भांगरवाडीत हा मेळावा झाला. सुरेखा जाधव, राजाभाऊ खळदकर, अरविंद कुलकर्णी, देविदास कडू, बाळासाहेब जाधव उपस्थित होते. पुजारी म्हणाले, ‘‘लोणावळ्याने महायुतीला नेहमीच आघाडी मिळवून दिली आहे. महायुतीचे उमेदवार बारणे यांची आघाडी कायम राखण्यासाठी प्रयत्न करू.’’

Web Title: Loksabha Election 2019 Shivsena NCP Politics Shrirnag barne Parth Pawar Publicity Politics