Loksabha 2019 : तरुण नवमतदार ठरविणार खासदार

Voting
Voting

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदारांपैकी तिशीच्या आतील वयोगटातील तरुणांची संख्या साडेबारा लाखांहून अधिक आहे. त्यात १८ ते १९ वर्षे या वयोगटातील मतदार ५४ हजारांहून जास्त असून, ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्‍क बजावतील. जिल्ह्यातील तरुण नवमतदारांची संख्या पाहता चार लोकसभा मतदारसंघांतील खासदार ठरविण्यात तरुणांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिलला, तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. सध्या प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्‍चितीची प्रकिया अंतिम टप्प्यात आहे. 

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या ७३ लाख ६३ हजार ८१२ इतकी आहे. त्यात भोसरी, खडकवासला आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघात तिशीच्या आतील मतदारांची संख्या ७५ हजारांहून अधिक आहे. या तुलनेत कसबा पेठ, पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तिशीच्या आतील तरुण मतदार कमी आहेत. ही संख्या अनुक्रमे ३६ हजार, ३७ हजार आणि ३९ हजारांच्या जवळपास आहे. या निवडणुकीत काही राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात बेरोजगारीचा मुद्दा राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com