#Loksabha2019 : मोदी सरकार हे पाकिस्तान नाही, तर देशातील मुस्लिम विरोधात : हुसेन दलवाई

pune
pune

पुणे  : "केंद्रातील मोदी सरकार हे पाकिस्तान नाही, तर देशातील मुस्लिम विरोधात आहे,' असा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी केला. "देशात मोदी विरोधात सुप्त लाट आहे. त्यामुळे देशातील भावी सरकार हे काँग्रेस आघाडीचे सरकार असेल,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रकार परिषदेत दलवाई बोलत होते. यावेळी उल्हास पवार ,शरद रणपिसे, अंकुश काकडे, गोपाळ तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. ''

''पाकिस्तानचे पंतप्रधान हे मोदीच पुन्हा सत्तेवर यावेत, अशी इच्छा व्यक्त करतात. यावरून मोदी आणि इम्रान खान या दोघांमध्ये नक्कीच साटेलोटे असल्याचा संशय येतो. पाकिस्तानमध्ये या सरकारमधील अनेकांची गुंतवणूक आहे. त्यात गडबड होऊ नये यांची ते काळजी घेत आहेत'', असे सांगून दलवाई म्हणाले," 2014 मध्ये सत्तेवर येण्यासाठी मोदी सरकारने जी आश्‍वासने दिली होती. त्यापैकी एकही आश्‍वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. या निवडणुकीतही मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात काय विकास केला हे न सांगता राष्ट्रवाद, देशभक्ती या मुद्यांवर बोलत आहेत. प्रचारासाठी मुद्दाच नसल्याने महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करीत आहे. हे निषेधार्ह आहे.'' 

''जनसंघाच्या स्थापनेपासूनचा जाहीरनामा पाहिला, तर तेच आश्‍वासन या निवडणुकीतील जाहीरनाम्यात देखील भाजपकडून देण्यात आले आहे. 370 कलम रद्द करणे, राममंदिर, समान नागरी कायदा तीच तीच आश्‍वासने देत असून त्यापलीकडे या जाहीरनाम्यात नवीन काही नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे'', असे सांगून दलवाई म्हणाले," वंचित विकास आघाडी कोणताही परिणाम होणार नाही. भाजपला मदत करण्यासाठीचे ही आघाडी असून मुस्लिम आणि वंचित मतदारांच्या लक्षात हे आले आहे.'' तर माढा येथील पंतप्रधान मोदी यांच्या स्टेजवर गेल्याबद्दल विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात येईल, असे अंकुश काकडे यांनी यावेळी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com