Loksabha 2019 : खासदार उच्चशिक्षित असावा

Loksabha 2019 : खासदार उच्चशिक्षित असावा

पुणे - लोकशाहीमध्ये निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे. या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणामध्ये पार पडल्या पाहिजेत. खासदार हा उच्चशिक्षित असावा व त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसली पाहिजे. तरुण ते वृद्ध यांच्या समस्या सोडविणारा असला पाहिजे.

वैष्णवी रांगोळे
निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेठीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्‍यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो. त्यामुळे मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. खासदार निवडताना त्याचा इतिहास, शिक्षण, केलेले काम या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

स्नेहल पवार
खासदार निवडताना तो युवा आणि युवकांच्या समस्यांचे निराकरण करणारा असावा. त्यास समाजातील विविध स्तरावरील समस्यांची जाणीव असली पाहिजे. सामान्य लोकांमध्ये जाणारा खासदार निवडला पाहिजे. विकास कामे करताना सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. तरुण ते वृद्ध सर्वांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणणारा उमेदवार खासदार निवडून आला पाहिजे.

चैताली अवधानी
उमेदवाराने प्रथम स्वतःची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. तो उच्चशिक्षित असावा. त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसावी. निवडून आल्यावर त्याने प्राधान्यक्रमाच्या गोष्टी आधी कराव्यात. चांगले रस्ते खोदून परत करण्यावर अनावश्‍यक खर्च न करता मूलभूत पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि टेकड्यांवरील हिरवाईचे जतन करण्याचे धोरण त्याच्याकडे असावे.

हर्षदा चौरे
शिक्षणाच्या प्रश्‍नावर काम करणारा खासदार हवा आहे. एखादी महिला निवडणूक लढवत असेल तर ती चांगली गोष्ट असेल. ती शहरातील महिलांच्या समस्यांना सोडवण्यासाठी काम करेल. सध्या बेरोजगारी आहे. त्यामुळे उमेदवाराने तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठीचे त्याचे धोरण जाहिरनाम्यात मांडावे.

लोकसभा 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com