Election Results : खासदार सुप्रिया सुळे यांची हॅटट्रीक

रमेश वत्रे
गुरुवार, 23 मे 2019

पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. 

पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. 

बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे यांना 679503 मते , भाजपच्या कांचन कुल यांना 526714 मते तर, वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडाळकर यांना 43666 मते मिळाली आहेत. सुप्रिया सुळे यांनी 94453 मतांनी आघाडी मिळवली आहे. 

खासदार सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होत्या. खासदार सुळे यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा दुपटीने मताधिक्य वाढवत दणदणीत विजय संपादन केला आहे. दौंडमधील कुल कुटुंबियांचे पवार यांच्या विरोधातील हे तिसरे बंड होते.  कुल कुटुबियांची आधीची दोन्ही बंड यशस्वी झाली होती. तिसरे बंड यशस्वी होणार का याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. मात्र सुळे यांनी त्यांचे तिसरे बंड यशस्वी होऊ दिले नाही. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असताना दौंड तालुक्यात कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  देशात व राज्यात भाजपला मोठे यश मिळाले असले तरी बारामती लोकसभा मतदार संघात भाजपला अपयश आले असल्याने भाजप व रासपच्या गोटात निरव शांतता आहे. तर राज्य पातळीवर राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. याशिवाय  मावळ लोकसभा मतदार संघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. दुपारी अडीचवाजेपर्यंत काही अपवाद वगळता राष्ट्रवादीचा जल्लोष पहायला मिळाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule's hat-trick