Loksabha 2019 : खासदार सुळेंच्या कुटुंबियांकडे 141 कोटींची संपत्ती; 27 कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबियाच्या नावे 140 कोटी 88 लाख 88 हजार 702 रुपयांची मालमत्ता आहे. सुळे यांनी बुधवारी (ता.3) सतराव्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत देण्यात आलेल्या शपथ पत्रात त्यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तेचा तपशिल दिला आहे. या आधीच्या लोकसभा निवडणुकीच्या (2014) तुलनेत त्यांच्या संपत्तीत 26 कोटी 88 लाख 88 हजार 702 रुपयांची वाढ झाली आहे. पाच वर्षांपुर्वी त्यांची संपत्ती 113 कोटी 90 लाख रुपायांची होती. 

खासदार सुळे यांच्या नावावर 39 कोटी 67 लाख 36 हजार 253 रुपयांची मालमत्ता असून, त्यात 21 कोटी 26 लाख 96 हजार 955 रुपयांच्या जंगम तर, 18 कोटी 40 लाख 39 हजार 298 रुपायांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. पती सदानंद सुळे यांच्या नावावर 88 कोटी11 लाख 30 हजार 855 रुपयांची संपत्ती आहे. यापैकी 83 कोटी 96 लाख 24 हजार 527 रुपयांची जंगम तर, चार कोटी 15 लाख सहा हजार 328 रुपायांची स्थावर मालमत्ता आहे. मुलगी रेवती हिच्या नावावर आठ कोटी 92 लाख आठ हजार 145 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मुलगा विजय याच्या नावावर चार कोटी विजय याच्या नावे 4 कोटी 18 लाख 13 हजार 449 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रेवती आणि विजय यांच्या नावे स्थावर मालमत्ता नाही. सुळे यांच्या कुटुंबियाकडे एकही गाडी नाही. 

सुळे कुटुंबियांकडे मिळून एकूण 94 हजार 320 रुपयांची रोकड, पाच कोटी 57 लाख 44 हजार 468 रुपयांच्या ठेवी, 48 कोटी 67 लाख 39 हजार 943 रुपयांची बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स (समभाग), सुळे पती-पत्नीच्या विदेशी बॅंकातील ठेवी व गुंतवणूक 13 कोटी 21 लाख 40 हजार 563 रुपये, कुटुंबियाकडे 4 कोटी 44 लाख 13 हजार 165 रुपयांचे सोने, चांदी व हिरे, बारामती तालुक्‍यातील माळेगाव व ढेकळवाडी येथे 2 कोटी 70 लाख 82 हजार 520 रुपये किमतीची सहा हेक्‍टर 76 आर शेतजमीन, 1 कोटी, 3 लाख सहा हजार 200 रुपये किमतीची 72 आर बिगर शेती जमीन, सुप्रिया सुळे यांच्या नावे मुंबई व पुण्यात प्रत्येकी एक सदनिका आहे. या दोन्ही सदनिकांची किंमत 14 कोटी 66 लाख 50 हजार 578 रुपये आहे. पती सदानंद सुळे यांच्या नावे पुण्यात एक सदनिका असून तिची किंमत 4 कोटी 15 लाख सहा हजार 328 रुपये असल्याचेही या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. 

सुळे यांच्याकडे 55 लाखांची देणी 
खासदार सुप्रिया सुळे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्याकडून 20 लाख रुपयांचे आणि पार्थ यांची आई सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले आहेत. या दोघांना मिळून 55 लाख रुपयांचे देणे असल्याचेही सुळे यांनी या शपथपत्रात दर्शविले आहे. 
 
Web Title: MP's Sule Family's assets worth Rs 141 crore; 27 crores increase