Loksabha 2019 : फलकबाजांवर महानगरपालिकेची नजर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापलिकेच्या हद्दीतील प्रामुख्याने रस्ते, चौकांमधील फलक काढण्यात आले. आता पुन्हा फलक लावल्यास कठोर कारवाईचा इशारा देत, शहर विद्रुप न करण्यासोबत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांना पत्र पाठविले. 

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि बैठकांची जाहिरातबाजी फलकांद्वारे मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची नजर राहणार आहे. सभा, बैठका आणि अन्य कार्यक्रमांचे फलक आणि झेंडे दिसून आल्यास ते ताब्यात घेतानाच संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापलिकेच्या हद्दीतील प्रामुख्याने रस्ते, चौकांमधील फलक काढण्यात आले. आता पुन्हा फलक लावल्यास कठोर कारवाईचा इशारा देत, शहर विद्रुप न करण्यासोबत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांना पत्र पाठविले. 

निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोनच दिवस राहिली आहे. त्यानंतर राजकीय पक्षांच्या सभा आणि बैठका वाढणार आहेत. याच काळात परवानगी न घेता फलक उभारले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशा फलकांवर लक्ष ठेवून लगेचच कारवाई करण्याच्या उद्देशाने महापालिकेने पथके नेमली आहेत, अशी माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी दिली. 

Web Title: Municipal corporation watch on hoarding