Loksabha 2019 :  काँग्रेसच्या पाठीशी ‘राष्ट्रवादी’ची ताकद

Loksabha 2019 :  काँग्रेसच्या पाठीशी ‘राष्ट्रवादी’ची ताकद

पुणे -  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपली राजकीय घडी बसविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याची व्यूहरचना आखली आहे. पुण्यात मित्रपक्ष काँग्रेसचा उमेदवार असला तरी, पक्षातील विद्यमान पदाधिकारी-नगरसेवकांसह माजी नगरसेवकांनीही झोकून काम करावे, असे फर्मान ‘राष्ट्रवादी’च्या वरिष्ठ नेत्यांनी सोडले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील पराभव, गटातटाच्या राजकारणामुळे पक्षसंघटनेपासून दुरावलेले पदाधिकारी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

पुण्यातील ‘राष्ट्रवादी’चे बहुतांश पदाधिकाऱ्यांची फळी बारामती, मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांत अनुक्रमे खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारात आहे. काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईपर्यंत शहरातील कार्यकर्त्यांनी या तीन मतदारसंघांत लक्ष घालावे, अशी सूचना ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी नुकतीच केली. त्यामुळे खडकवासला, कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी आपापल्या परीने या तिन्ही मतदारसंघांत फिरत आहेत. लवकरच पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी विशेषत: माजी नगरसेवक काँग्रेसचे काम करण्यास अनुत्सुक आहेत. अशा पदाधिकाऱ्यांचे कान अजित पवार यांच्यासह सुळे यांनी वेळोवेळी उपटले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणि काँग्रेससाठी उत्साहाने काम करण्याचा आदेश पवार यांनी गेल्या आठवड्यात दिला. मात्र, काही जणांच्या काँग्रेस नेत्यांमुळेच पराभव स्वीकारावा लागल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची नाराजी उघड होण्याची भीती आहे. पवार यांच्या आदेशानंतरही काँग्रेससाठी ‘राष्ट्रवादी’तील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते झटणार का, हा औत्सुक्‍याचा विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com