काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे टांगा पलटी घोडे फरार  : डॉ. निलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे : ''पुणे आणि नगरच्या जागेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती ही 'टांगा पलटी घोडे फरार अशी झालेली आहे. ही खिळखिळी झालेली यंत्रणा आमच्यासाठी फायदेशीर आहे, असा दावा शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी केला. 

पुणे : ''पुणे आणि नगरच्या जागेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती ही 'टांगा पलटी घोडे फरार अशी झालेली आहे. ही खिळखिळी झालेली यंत्रणा आमच्यासाठी फायदेशीर आहे, असा दावा शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी केला. महायुतीचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आज भाजप शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आमदार विजय काळे, शिवसेनेचे राजेंद्र शिंदे, रिपाइचे मंदार जोशी यावेळी उपस्थित होते.

''महायुतीची घोषणा झाल्यापासून शिवसेना भाजप एकत्रच आहेत, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे एक शरीराचे दोन चेहरे असे असे झाले आहे. पुण्याचा विकास होत असून समाजिक प्रश्नही सुटत आहेत. पुर्वी पुणे हे दहशतवादी, माओवादी यांच्या हिंसक कारावायांमुळे अशांत झाले होते, पण गेल्या पाच वर्षात पुणे सुरक्षित शहर झाले आहे. असे गोऱ्हे यांनी सांगितले. 

''शिरूरमध्ये २५ एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा
''शिरूरमध्ये २५ एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. अशोक मोहळ हे खासदार असताना मोहळ यांना दाखवा एक हजार मिळवा अशी घोषणा केली होती. पण गेल्या १५ वर्षांत आढळराव पाटील यांच्यावर वेळ आली नाही. त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने ते यावेळी एक लाख मताधिक्याने निवडून येतील. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना जो कोणी प्रचार करायला शिकवत आहे, त्यालाच कसा प्रचार केला पाहिजे हे शिकवणे गरजेजे आहे, असा टोला लगावत, गोऱ्हे म्हणाल्या, पार्थ यांना कधी घोड्यावर बसवतात, फादरकडे घेऊन जातात, रस्त्याने पळवतात असे करणे योग्य नाही. माढा मतदारसंघात दृश्य व अदृश्य घटक काम करत असल्याने महायुतीचा उमेदवार विजयी होईल. 

जयाप्रदा यांच्यावर झालेली टीका लांछनास्पद आहे. निवडणूक आयोगाने आझम खान यांची उमेदवारीच रद्द केली पाहिजे. राम मनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस यांनी समाजवादी विचार पुढे आणला, अशा पक्षात अशा पद्धतीने टीका होते हे निषेधार्य आहे. राज ठाकरे यांना वेळ असल्याने ते कोठेही सभा घेण्यासाठी जातात, त्यांचा प्रभाव जास्त असल्याने त्यांचा एक आमदार निवडून आला, तो ही आता आमच्याकडे आहे असा टोला त्यांनी लावला. 

मतदानासाठी स्वतःला सक्ती करा 
''२०१४ ची मतदानाची टक्केवारी वाढली होती, पण २०१९ ला पहिल्या टप्प्यात कमी झाले आहे. 
जागरूक नागरिक म्हणून स्वतःने स्वतःला मतदानाची सक्ती करणे आवश्यक आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 
 

Web Title: Nilam Gorhe Speak about NCP and congress