LokSabha2019 : निवडून येण्याच्या क्षमतेमुळे पक्षाकडून उमेदवारी : जोशी (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याला पक्षाला उमेदवारी दिली. 

गिरीश बापटांना माझ्या उमेदवारीने भीती- 
मला संदेश देण्यासाठी गिरीश बापटांना त्यांच्या मुलाचा आधार घ्यावा लागला यातच त्यांची हार आहे. पुणेकरांच्या मनातील खासदार माझ्या रुपाने निवडणूकीचा निकाल लागल्यावर कळेलच. काँग्रेस पक्षाचा आदेश आम्ही स्विकारतो. 1999 मध्येही तसेच झाले होते. माझ्या विरोधात राळ उठवली होती. त्यावेळी 2 लाखाहून अधिक मते मला मिळाली होती. तेव्हा भाजप उमेदवारापेक्षा 1 लाख मत मला अधिक मिळाली होती.

विजयाचे गणीत - पुण्यातील आठ पैकी सहा आमदार, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश बापट यांच्या विरोधात आहेत. माझा जाहीरनामा विकासाचा आहे. तुरडाळ, रेशन दुकान प्रकरणात हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत असा चेहरा भाजपने दिला आहे. पुण्यात जातीवर निवडणूक होत नाही. पुणेकर पुण्याचा चेहरा, स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार निवडूण आणतात. पालकमंत्र्यांनी पाच वर्षात पाण्याचा प्रश्नही सोडवात आला नाही. पुण्यातील चारही धरणं काँग्रेसच्या काळात बांधण्यात आली आहेत. परंतु, पुणेकरांना कधीही पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नाही. परंतु, मागील पाच वर्षात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कारण पालकमंत्र्याने पुणेकरांचे पाणी पळवले.
गिरीश बापट हे पालमंत्री म्हणून शंभर टक्के अपयशी ठरले आहेत.  

पुणे शहरातील पर्यावरण, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, तरुणांसाठी रोजगार, शिक्षणामध्ये सुधारणा हाच माझा अजेंडा असणार आहे.

Web Title: Party is Confident that I will win Pune Loksabha says Mohan Joshi